International Tiger Day 2021 : आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन, का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या...
International Tiger Day 2021 : वाघ हा निसर्गातील की-स्टोन प्रजातींपैकी एक मानला जातो. वाघांमुळे निसर्गाची विविधता आणि संपन्नता कायम राहते. निसर्गाच्या अन्न साखळीमध्ये त्याचे स्थान सर्वात वरचे आहे. त्यामुळे निसर्गातील इतर प्राण्यांच्या संख्येमध्ये समतोलता राहून पर्यायाने निसर्गातील समतोलता टिकवली जाते.(photo courtesy : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण नैसर्गिक अधिवास नष्टता, अवैध शिकार, तस्करी, जंगलतोड आणि इतर कारणांमुळे आज वाघांची संख्या प्रचंड वेगाने कमी होतेय. त्यावर जागरुकता करण्यासाठी दरवर्षी 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा करण्यात येतोय. (photo courtesy : pixabay)
रशियातील सेंट पीटर्सबर्ग मध्ये 29 जुलै 2010 साली झालेल्या व्याघ्र संवर्धनाच्या शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. (photo courtesy : pixabay)
या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणे असा आहे. त्या माध्यमातून मानव-वाघ संघर्षाची दरी कमी करणे आणि निसर्गाचे संवर्धन करणे साध्य केले जाऊ शकेल. (photo courtesy : pixabay)
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसाची घोषणा करताना 2022 पर्यंत जगभरातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं. जगभरातील वाघांच्या संख्येपैकी 75 टक्के वाघ हे केवळ भारतात सापडतात. भारतामध्येही 2022 पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय ठेऊन त्याच्या संवर्धनाचं काम करण्यात येतंय. (photo courtesy : pixabay)
दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करताना एक थीम तयार केली जाते आणि पुढच्या वर्षभरात त्यावर काम केलं जातं. या वर्षीच्या व्याघ्र दिनाची थीम ही “Their Survival is in our hands” अशी आहे. (photo courtesy : pixabay)
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभरात सुमारे एक लाखांहून अधिक वाघ होते. वर्ड वाईल्डलाईफ फंडच्या आकडेवारीनुसार सध्या ही संख्या केवळ 3900 इतकी आहे. यापैकी सुमारे 2,967 वाघ हे केवळ भारतात आढळतात. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व भारतासाठी विशेष आहे. (photo courtesy : pixabay)