Delhi Weather Update : दिल्लीत अनेक ठिकाणी वरुणराजाची हजेरी, हवामान तज्ज्ञांनी काय म्हटलं?
सोमवारी (27 नोव्हेंबर) संध्याकाळी देशाची राजधानी दिल्लीच्या अनेक भागात मेघगर्जनेसह गारपिटीसह पाऊस झाला. परिणामी हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, कमाल तापमान 24.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअस कमी आहे.
दिल्लीचा 24 तासांचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) दुपारी 4 वाजता 395 आणि रात्री 9 वाजता 391 नोंदवला गेला. त्याच वेळी, किमान तापमान 13.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सिअसने कमी आहे.
रविवारी दुपारी 4 वाजता सरासरी AQI 395 नोंदवला गेला. (फाइल फोटो)
शून्य आणि 50 मधील AQI 'चांगला' आहे, 51 ते 100 'समाधानकारक' आहे, 101 ते 200 'मध्यम' आहे, 201 ते 300 'खराब' आहे, 301 ते 400 'अत्यंत खराब' आहे.', आणि 401 ते 500 दरम्यान 'गंभीर' मानले जाते. (फाइल फोटो)
राजधानीत सोमवारी आर्द्रता पातळी 61 ते 100 टक्के दरम्यान राहिली. (फाइल फोटो)
मंगळवारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा आणि सकाळी हलके ते मध्यम धुके राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. (फाइल फोटो)
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 25 अंश सेल्सिअस आणि 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय. (फाइल फोटो)