PHOTO : पंतप्रधानांनी खरगेंसोबत एकाच टेबलवर स्नेहभोजनाचा आनंद लुटला!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील सहकारी सदस्यांसह मिलेट्स ईयर 2023 निमित्त कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा आनंद लुटला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी जवळपास 40 मिनिटं उपस्थित होते.
यावेळी त्यांच्यासोबत कृषीमंत्री नरेंद्र तोमर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा बसले होते.
विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एकाच टेबलवर मिलेटपासून तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेताना दिसले.
देशासाठी भाजपचा कुत्रा देखील कामी आला नसेल, अशी टिप्पणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केल्यानंतर राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जोरदार गदारोळ झाला. मल्लिकार्जुन खरगे यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी खासदारांनी केली.
या पदार्थांमध्ये बाजरीची खिचडी, नाचणी डोसा, नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, हळदीची भाजी, बाजरी चुरमा यांचा समावेश होता. गोड पदार्थांमध्ये बाजरीची खीर तसंच बाजरीच्या केकचा समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय मिलेट ईयर' (IYOM) घोषित केलं आहे.
भारत सरकारने एप्रिल 2018 मध्ये मिलेटला पौष्टिक अन्नधान्य म्हणून अधिसूचित केलं होतं आणि पोषण मिशनमध्ये मिलेटचाही समावेश करण्यात आला आहे.
मिलेट्स म्हणजे ऊर्जा आणि पोषण देणारी भरड धान्ये. गहू, तांदूळ, मका, बार्ली सोडून जी इतर धान्ये आहेत, ती 'मिलेट' या नावाने ओळखली जातात. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई (भगर), राळा, भादली अशी किमान सात ते आठ भरड धान्ये आहेत.
गेल्या 5 वर्षात आपल्या देशात 13.71 ते 18 दशलक्ष टन पेक्षा जास्त मिलेटचं उत्पादन झालं असून 2020-21 मध्ये सर्वाधिक उत्पादन झालं आहे.