Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Republic Day 2024: 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोजी ' तिरंगा ' वेगवेगळ्या पद्धतीने का फडकाविला जातो?
या वर्षी स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाल्यापासून तो पहिला प्रजासत्ताक दिन होता. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे : 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज खेचला जातो आणि नंतर तो फडकवला जातो. आणि 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकत राहतो. [Photo Credit : Pexel.com]
ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच दिवशी ब्रिटीश सरकारने आपला ध्वज उतरवून भारतीय तिरंगा फडकवला, त्यामुळे दरवर्षी १५ ऑगस्टला तिरंगा ओढला जातो आणि मग फडकवला जातो. या प्रक्रियेला ध्वजारोहण flag hosting म्हणतात. [Photo Credit : Pexel.com]
26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकत राहतो. ते फक्त फडकवले जाते. यामुळेच याला ध्वजारोहण न म्हणता ध्वज फडकवणे flag unfurling असे म्हणतात. [Photo Credit : Pexel.com]
भारत देशाच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून ध्वज फडकवला जातो. [Photo Credit : Pexel.com]
15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान ध्वजारोहण करतात. [Photo Credit : Pexel.com]
26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण केले जाते. [Photo Credit : Pexel.com]
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य कार्यक्रमात देशाचे राष्ट्रपती तिरंगा फडकवतात आणि त्याला सलामी देतात. [Photo Credit : Pexel.com]
राष्ट्रपती 26 जानेवारीलाच ध्वजारोहण का करतात? पंतप्रधान हा देशाचा राजकीय प्रमुख असतो तर राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख असतो. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली. [Photo Credit : Pexel.com]
त्याआधी देशात ना संविधान होते ना राष्ट्रपती. यामुळे दरवर्षी 26 जानेवारीला राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकावतात. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]