Republic Day Parade 2024: प्रजासत्ताकदिनी राजपथावर दिसले 'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ चित्ररथ
राजधानी दिल्लीत राजपथावर आज प्रजासत्ताक दिनी, अर्थात 26 जानेवारी रोजी होणाऱ्या पथसंचलनात भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज’ चित्ररथ दिसले(Photo Credit : facebook/narendramodi)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या देखाव्यावरील संपूर्ण शिल्प यवतमाळ जिल्ह्यात तयार करण्यात आली आहे. (Photo Credit : facebook/narendramodi)
त्यामुळे यवतमाळचे नाव राजधानी दिल्लातही कोरले गेले.(Photo Credit : facebook/narendramodi)
शिवाजी महाराजांचे कार्य आजही सर्वांना प्रेरणादायी आहे. (Photo Credit : facebook/narendramodi)
महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली. (Photo Credit : facebook/narendramodi)
सन 2024 या वर्षाच्या प्रजासत्ताक दिन नवी दिल्ली चित्ररथ संचलनात 28 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी या दोन संकल्पनांवरती विविध राज्यांना आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने कळविले होते(Photo Credit : facebook/narendramodi)
यास अनुसरून विविध विषयांवर केंद्र शासनास संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 350 वे शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त शिवराज्याभिषेकाचा 350 वा महोत्सव आणि लोकशाहीची प्रेरणा या विषयांची सांगड घालून लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित सादरीकरण संरक्षण मंत्रालयास करण्यात आले होते. (Photo Credit : facebook/narendramodi)(Photo Credit : facebook/narendramodi)
नवी दिल्ली येथे साकारण्यात येणाऱ्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या, बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग या रथावर दर्शविण्यात आले.(Photo Credit : facebook/narendramodi)
महाराष्ट्राच्या चित्ररथाला अनेकदा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळाला आहे(Photo Credit : facebook/narendramodi)
यंदाही महाराष्ट्राचा चित्ररथ बाजी मारेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (Photo Credit : facebook/narendramodi)