Scuba Diving In India: 'स्कूबा डायव्हिंग'चा संपूर्ण अनुभव घ्यायचाय? आताच तुमच्या प्रवासाच्या यादीत समाविष्ट करा ही ठिकाणं
प्रवासाची आवड असलेल्यांच्या यादीत स्कूबा डायव्हिंगला नेहमीच प्राधान्य दिले जाते. निळ्याशार समुद्रात रंगीबेरंगी आणि विविध प्रकारचे मासे, जलचर प्राणी पाहायला कोणाला आवडणार नाही?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्कुबा डायव्हिंग हा एक असा अनुभव आहे, जो प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी अनुभवायचा असतो. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा सहा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही मुक्तपणे समुद्रात खोलवर जाऊन स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.
अंदमान आणि निकोबार बेटांवर तुम्ही स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. कारण बंगालच्या उपसागरात विविध प्रकारचे समुद्री जीव आढळतात. अंदमान हे भारतातील सर्वोत्तम स्कूबा डायव्हिंग डेस्टिनेशन मानले जाते. येथील स्फटिकासारखे स्वच्छ पाणी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम स्कूबा डायव्हिंगचा अनुभव देईल. जेव्हा तुम्ही पाण्यात उडी मारता तेव्हा तुम्हाला कासव, मोरे ईल्स, ट्रेव्हली, मांता रे आणि बॅटफिश असे विविध प्रकारचे समुद्री जीव पाहायला मिळतात.
अरबी समुद्रात स्थित लक्षद्वीप बेटे देखील स्कूबा डायव्हिंग उत्साही लोकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथील स्वच्छ पारदर्शक पाणी लक्षद्वीपला स्कूबा डायव्हिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण बनवते. लॉस्ट पॅराडाइज, फिश सूप, प्रिन्सेस रॉयल, क्लासरूम, मांता पॉइंट आणि डॉल्फिन रीफ हे लक्षद्वीपमधील प्रसिद्ध डायव्हिंग स्पॉट्स आहेत.
भारतातील सर्वोत्कृष्ट स्कुबा डायव्हिंग ठिकाणांमध्ये पाँडिचेरीचे नाव देखील समाविष्ट आहे. पाँडिचेरीला येणाऱ्या लोकांनी येथील स्कूबा डायव्हिंगचा अनुभव अजिबात चुकवू नये.
केरळ हे भारतातील एक सुंदर राज्य आहे. आपण बोट हाऊस ते स्कूबा डायव्हिंगपर्यंत येथे आनंद घेऊ शकता. स्कूबा डायव्हिंगसाठी हे स्थान सर्वोत्कृष्ट मानले जाते. केरळमधील कोवलम हे ठिकाण स्कूबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे. मार्च ते सप्टेंबर पर्यंत आपण कधीही येथे सहलीची योजना आखू शकता.
गोव्यात प्रत्येक प्रकारच्या पर्यटकांसाठी काही ना काही दडलेले आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले हे राज्य एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. तुम्ही या राज्याला भेट देण्यासाठी येत असाल तर समुद्राच्या पाण्यात स्कूबा डायव्हिंगचा आनंद घ्यायला विसरू नका.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ल्याशेजारी असणारे तारकर्ली स्कूबा डायव्हिंगसाठी योग्य ठिकाण आहे. तारकर्लीचे शुद्ध पाणी पाहून आपण अंदाज घेऊ शकता की समुद्रातील विविध प्रकारचे प्राणी येथे सहज दिसू शकतात. स्कूबा डायव्हिंगसाठी लोकांना स्पीड बोटने दांडी बीच येथून डायव्हिंगच्या ठिकाणी नेले जाते.