Passing Out Parade Dehradun: देहराडून येथील भारतीय लष्करी अकादमीत पासिंग आउट परेड...
नियमित अभ्यासक्रमाचे 152 कॅडेट्स तसेच तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाचे 135 आणि सात मित्र देशांतील 42 कॅडेट्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअसे सर्व मिळून एकूण 374 कॅडेट्सनी भारतीय लष्करी अकादमी (IMA) मधून आपले प्रशिक्षण पूर्ण करून ते यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्याचे पाहायला मिळाले (PC:PTI)
यावेळी उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सचे पालक आणि कुटुंबातील सदस्य यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली (PC:PTI)
सोबतच आपल्या पाल्यांना भारतीय सैन्यात कायमस्वरूपी नियुक्ती मिळाल्याच्या या क्षणांना त्यांनी आपल्या हृदयात साठवले (PC:PTI)
पासिंग आऊट परेड म्हणजे नेतृत्व, स्वयंशिस्त आणि युद्ध कलेचे प्रशिक्षण देणारी प्रमुख संस्था, आयएमए (IMA) च्या कठोर प्रशिक्षणाचा समारोप आहे. (PC:PTI)
शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी आवश्यक बौद्धिक, नैतिक आणि शारीरिक गुणांचा इष्टतम विकास हा आयएमए(IMA) मधील प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. (PC:PTI)
आयएमए(IMA) मधील प्रशिक्षण देशभक्ती, चारित्र्य, गतिमानता, पुढाकार आणि समजूतदारपणा विकसित करते जे भारतीय सैन्यातील नेतृत्वाचा आधार आहे. (PC:PTI)
यावेळी लष्करप्रमुखांनी परेड कमांडर आणि सहभागी कॅडेट्सचे तसेच जवानांनी आत्मसात केलेले प्रशिक्षण (PC:PTI)
आणि शिस्तीच्या उच्च दर्जाचे संकेत देणार्या मनमोहक आणि समन्वयित कवायतीचे कौतुक केले. (PC:PTI)
लष्कराच्या भावी अधिकाऱ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांनी भारतीय लष्करी अकादमी (IMA) मधील प्रशिक्षक आणि कर्मचारी यांचेही कौतुक केले. (PC:PTI)