Hyderabad Fish Prasadam : दम्यावरील रामबाण उपाय 'फिश प्रसादम'...
दम्याचा आजार असणाऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या हैदराबादच्या 'फिश प्रसादम' (Fish Prasadam) अर्थात दम्यावरील घरगुती तयार केलेल्या औषधाच्या वाटपाला आजपासून सुरूवात झाली आहे. (Photo:PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी मृग नक्षत्र (Mrigasira Karti) सुरू झाल्यानंतर दोन दिवस या माशाच्या तोंडाला लावण्यात आलेल्या औषधाचं वाटप करण्यात येतं. (Photo:PTI)
जिवंत माशाच्या तोंडाला विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेलं औषध लावण्यात येतं आणि तो मासा रुग्णाच्या घशात सोडण्यात येतो. हैदराबादच्या बाथिनी कुटुंबाकडून (Bathini Family) हे औषध दमाग्रस्तांना देण्यात येतं. (Photo:PTI)
या वर्षी शुक्रवार 9 जून आणि शनिवारी 10 जून रोजी या औषधाचं वाटप करण्यात येणार आहे. (Photo:PTI)
कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून या औषधाचं ( Hyderabad Fish Prasadam) वाटप करण्यात आलं होतं. (Photo:PTI)
यंदा मात्र मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर या फिश प्रसादमचं वाटप सुरू झालं आहे. देशभरातून लाखो दमाग्रस्त रुग्ण हे औषध घेण्यासाठी हैदराबादमध्ये येतात. (Photo:PTI)
तसेच हा उपचार घेण्यासाठी काही परदेशी नागरिक आणि एनआरआयही हैदराबादमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. (Photo:PTI)
हैदराबामधील नामपल्ली एक्झिबिशन ग्राऊंडवर हा उपचार दिला जात आहे. (Photo:PTI)
तेलंगणाचे पशुसंवर्धन मंत्री तलासनी श्रीनिवास यादव यांच्या हस्ते 'फिश प्रसादम' चे वितरण सुरू करण्यात आलं आहे. (Photo:PTI)
या कार्यक्रमासाठी तेलंगणा सरकारने सर्व व्यवस्था केली आहे. या वर्षी जवळपास सहा लाख रुग्ण हा उपचार घेण्यासाठी येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. (Photo:PTI)