Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केरळात पावसाचं आगमन तर उत्तर भारतात पावसाची प्रतीक्षा..
देशात पाऊस घेऊन येणाऱ्या मान्सून वाऱ्याचं केरळमध्ये आगमन झालंय.. पाऊस म्हणजे चैतन्यच जणू.. केरळमध्ये मान्सूनच्या ढगांची गर्दी समुद्र किनाऱ्यावरुन अनुभवणं ही एक अवर्णणीय अनुभूतीच.. केरळच्या समुद्र किनाऱ्यावरील आकाश नभांचं आक्रमण झेलण्यासाठी सज्ज झालेलं असतं जणू.. (फोटो : पीटीआय)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमान्सूनचा पहिला तडाखा हा केरळला बसतो, म्हणूनच केरळमध्ये पावसाचं आगमन हा एक उत्सवच असतो.. तसेही आपले सर्व सण पावसाशी आणि जगणं किंवा लोकव्यवहार हा नद्यांशी संबंधित आहे. केरळमध्ये पाऊस सर्वाधिक म्हणूनच छत्रीही तिथल्या पावसाळी जगण्याचा एक भाग असते. छत्री असली तरी पावसात चिंब होण्याचा आनंद काही औरच! (फोटो - PTI)
हा फोटो केरळपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या ब्रह्मपुत्र नदीतील.. तिथेही पावसाचं वातावरण आहे. भारतात पाऊस घेऊन येणाऱ्या मान्सूनच्या दोन शाखा आहेत, एक नैऋत्य आणि दुसरी आग्नेय.. आसाममधील गुवाहाटी किंवा ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं हा आग्नेय मान्सूनचा प्रभाव असलेला परिसर.. आसामच्या आकाशातही पावसाच्या ढगांनी दाटी केलीय.. पावसाचा मारा करण्यासाठी हे ढग सज्ज झालेत. (फोटो : PTI)
आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये काल मुसळधार पाऊस झाला.. आपल्याकडे पहिला पाऊस कुठे आनंदाचा शिडकावा करतो तर कुठे सामान्य जनजीवनाची दैना उडवतो.. अर्थातच त्याला जबाबदार तो वरुणराज नाही तर आपल्याकडील रस्ते आणि नागरी सुविधाचं व्यवस्थापन करणारं प्रशासन.. गुवाहाटीतील पावसाने ठिकठिकाणी पाणी साचलं, रस्ते तुंबले..काही ठिकाणी तर या रस्त्यांचे नाले झाले. (फोटो - PTI)
रस्त्यांचे नाले झाले की सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होतं, पावसाचा आनंद तिरस्कारात बदलतो. पण थोडं पावसात भिजल्यावर तो तिरस्कारही ओसरतो.. (पीटीआय फोटो)
आपला भारत देश, आसेतुहिमाचल, केरळात मान्सून दाखल झाला म्हणजे संबंध भारतात पावसाळा सुरु होतो असं नाही, मान्सून त्याला असलेल्या अनुकूलतेनुसार पुढे पुढे सरकतो.. मान्सून पुढे सरकतो, तसं त्या त्या प्रदेशात तो ओलावा, चैतन्य शिंपडत जातो. यालाच कवि कालिदासांनी मेघदूत असं म्हटलंय. केरळात आलेला पाऊस पुढे हिमालयापर्यंत जातो ते कालिदासाच्या प्रियेचा निरोप घेऊन जातो, हा निरोप घेऊन जाणारा पोस्टमन म्हणजे आपला मान्सून, म्हणजेच मेघदूत.. (Photo : PTI))
केरळ-गुवाहाटीत पाऊस कोसळत असला तरी देशाच्या अन्य भागात मात्र भाजून टाकणारं ऊन आहे. सूर्यनारायणाचा प्रकोप कमी करण्यासाठी लोक कुठे छत्री घेतात तर कुठे रद्दीतल्या थर्माकोलचं शीटही पुरतं.. हा फोटो दिल्लीतला. या दिवसात केरळहून जसंजसं उत्तरेकडे जावं तसं तापमानातही उर्ध्वगामी वाढ होत जाते. (फोटो : पीटीआय))
आपला भारत देश, आसेतुहिमाचल, केरळात मान्सून दाखल झाला म्हणजे संबंध भारतात पावसाळा सुरु होतो असं नाही, मान्सून त्याला असलेल्या अनुकूलतेनुसार पुढे पुढे सरकतो.. मान्सून पुढे सरकतो, तसं त्या त्या प्रदेशात तो ओलावा, चैतन्य शिंपडत जातो. यालाच कवि कालिदासांनी मेघदूत असं म्हटलंय. केरळात आलेला पाऊस पुढे हिमालयापर्यंत जातो ते कालिदासाच्या प्रियेचा निरोप घेऊन जातो, हा निरोप घेऊन जाणारा पोस्टमन म्हणजे आपला मान्सून, म्हणजेच मेघदूत.. (PHOTO : PTI))
पंजाबमधील अमृतसर मधील हा शेतकरी.. शेतातल्या विहिरीतून येणाऱ्या पाण्याने आपली तहान भागवतोय. सूर्यनारायणाचा प्रकोप स्वतःपुरता का होईना कमी करण्याचा प्रयत्न करतोय. या दिवसात अमृतसरचं तापमान तब्बल 40 ते 42 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचतं.. (फोटो PTI)
केरळपासून सुरुवात झाल्यावर, वर्तूळ पूर्ण करण्यासाठी पुन्हा केरळातच.. उत्तरेतील भाजून टाकणारं ऊन किंवा दाह करणारा उकाडा अनुभवला की केरळमधील पावसाची ओढ लागते.. तिथे पावसात भिजण्याचा आनंद थोडा जास्त अनुभवता येतो. छत्री सोबत असली तरी हा पाऊस तुम्हाला कोरडा ठेवत नाही.. (फोटो - पीटीआय)