Mushal Malik : एकेकाळी काश्मीर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली होती जहरी टीका, आता रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; कोण आहे मुशाल मलिक?
जम्मू-काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकची पत्नी मुशाल मलिक हिचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिची रडून-रडून प्रचंड वाईट अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. त्याला कारणही तसंच आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्ली हायकार्टाने जम्मू काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकसाठी एक नोटीस पाठवली आहे. यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या एनआयएच्या अपीलवर, दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. यामुळे त्याची पत्नी मुशाल मलिक हिची रडून खूपच वाईट अवस्था झाली आहे.
काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक आणि मुशाल हुसेन मलिक यांच्यात पती-पत्नीचे नाते आहे. या दोघांची 2005 मध्ये पाकिस्तानमध्ये भेट झाली होती.
2005 च्या भेटीनंतर यासिन आणि मुशाल यांची ओळख वाढत गेली. 2009 मध्ये मुशाल हुसेन मलिक हिने यासिन मलिकसोबत विवाह केला होता.
फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या पत्नीने याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली होती.
अलीकडेच मुशाल हुसैन मलिक हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.यामध्ये नवऱ्याला वाचवण्यासाठी पाक सरकारकडे मदतीसाठी विनवणी करत आहे. यावेळी ती रडत असल्याचेही दिसून आले होते.
मुशाल हुसैन मलिक हिचा पती यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने शिक्षा ठोठावली आहे.
मुशाल हुसैन मलिक हिने भारत जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. तिच्या म्हणण्यानुसार, भारताकडून काश्मीरची सत्य परिस्थिती लपवण्यात येत आहे.
पाकिस्तानी हुरियत नेत्या मुशाल मलिक हिने याधाही भारतावर G-20 परिषदेवरून प्रश्न उपस्थित केले होते.
मुशाल मलिक हिने काश्मीरमध्ये भारताने दहशत पसरवल्याचा आरोप केला आहे.