Capital City Of India: 'हे' शहर होतं भारताची एक दिवसाची राजधानी
भारताची राजधानी अनेकदा बदलली आहे. दिल्लीच्या आधी भारताची राजधानी कोलकता हे शहर होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिथे कलकत्ता ही भारताची राजधानी मानली जात होती, तिथे उन्हाळ्यात ही राजधानी शिमल्यात हलवली जात होती.
पण इतिहासात एक दिवस असा होता जेव्हा राजधानी एक वेगळच शहर होतं.
हे शहर केवळ एका दिवसासाठी भारताची राजधानी होतं.
ते शहर म्हणजे अलाहाबाद (प्रयागराज) हे आहे.
अहवालानुसार, 1858 मध्ये अलाहाबादला एका दिवसासाठी भारताची राजधानी बनवण्यात आली होती.
असे म्हटलं जाते की, या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीने शहराचा कारभार ब्रिटीश राजेशाहीकडे सोपविला होता.
त्या काळात अलाहाबाद हे उत्तर भारतातील प्रमुख शहरांपैकी एक होते आणि उत्तर प्रदेशाची राजधानी देखील होती.
त्यावेळी अलाहाबाद हे ब्रिटीश सैन्याचे तळ असायचे आणि इंग्रजांनी इथे खूप काम केले आहे.