Sacred Rivers In Hinduism : गंगा, सिंधू, गोदावरी... हिंदू धर्मियांसाठी या 10 नद्या पवित्र
1. सिंधू नदी (Sindhu River) सिंधू नदी ही कैलाश पर्वतात म्हणजे तिबेटमध्ये उगम पावते आणि हिमालयातून भारतात प्रवेश करते. हिंदूंसाठी ही अत्यंत पवित्र नदी मानली जाते. सिंधू नदी नंतर पाकिस्तानमध्ये प्रवेश करते आणि अरबी समुद्राला मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2. नर्मदा नदी (Narmada River) मध्य प्रदेशमधील अमरकंटक येथे उगम पावणारी नर्मदा नदी ही भारतातील सर्वात मोठी पाचवी नदी आहे. तर सर्वात मोठी पश्चिम वाहिणी नदी आहे. ही नदी मध्य प्रदेश आणि गुजरातमधून वाहते. या नदीला रेवा असंही म्हटलं जातं.
3. अलकनंदा नदी (Alaknanda River) उत्तराखंडातील हिमालयात उगम पावणारी अलकनंदा ही नदी गंगेच्या उगमस्थानच्या पाच नद्यांपैकी एक नदी आहे. बद्रीनाथ या ठिकाणी या नदीवर मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि पूजाअर्चा करतात.
4. मंदाकिनी नदी (Mandakini River) अलकनंदाची उपनदी असलेली मंदाकिनी नदी ही उत्तराखंडात उगम पावते. रुद्रप्रयाग आणि सोनप्रगाय अशा 81 किमीच्या अंतरामध्ये ही नदी वाहते. नंतर ती अलकनंदा नदीला मिळते. केदारनाथ धाम या ठिकाणी या नदीला नमन केलं जातं.
5. सरस्वती नदी (Saraswati River) हिंदू धर्मातील पवित्र वेदांपैकी एक असलेल्या ऋगवेदात या नदीचा उल्लेख आहे. वेदीक काळातील साहित्यामध्येही या नदीचा उल्लेख पवित्र नदी असा आढळतो. ही नदी गंगा आणि यमुनेला मिळते. गंगा-यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी ही नदी गंगेत मिसळते.
6. गंगा नदी (Ganga River) भारतातील सर्वात पवित्र आणि सर्वात मोठी नदी अशी गंगेची ओळख आहे. गंगा नदी हिमालयात गंगोत्री येथे उगम पावते आणि नंतर ती पश्चिम बंगालमधून बांग्लादेशमध्ये प्रवेश करते. त्यानंतर ती बंगालच्या उपसागराला मिळते. बांग्लादेशमध्ये या नदीला पद्मा असं नाव आहे. भागीरथी आणि अलकनंदा या नद्या देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात आणि नंतर त्याची गंगा नदी बनते.
7. यमुना नदी (Yamuna River) यमुना नदी ही हिमालयातील यमुनेत्री या ठिकाणी उगम पावते आणि नंतर गंगेला मिळते. गंगा नदीची ही सर्वात मोठी उपनदी आहे. उत्तर प्रदेशातील मथुरेतील विश्राम घाट या ठिकाणी या नदीवर मोठी पूजा अर्चा केली जाते.
8. गोदावरी नदी (Godavari River) गोदावरी नदी ही गंगा नदी नंतरची सर्वात मोठी नदी आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी या नदीचा उगम होतो आणि नंतर ती तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या ठिकाणी वाहते आणि नंतर ती बंगालच्या उपसागराला मिळते. हिंदू धर्मियांसाठी ही पवित्र नदी असून या नदीला दक्षिण गंगा असंही म्हटलं जातं.
9. कृष्णा नदी (Krishna River) दक्षिण पठारावरील एक प्रमुख नदी असलेली कृष्णा नदी ही महाबळेश्वरमध्ये उगम पावते. महाराष्ट्रातून ही नदी कर्नाटका आणि नंतर आंध्र प्रदेश, तेलंगणामधून वाहते. हिंदू धर्मियांसाठी ही नदी पवित्र असल्याचं मानलं जातं आणि त्याच्या काठावर अनेक हिंदू धार्मिक स्थळं वसली आहेत.
10. कावेरी नदी (Kaveri River) पश्चिम घाटातील ब्रम्हगिरी पर्वतात कावेरी नदीचा उगम होतो आणि कर्नाटक आणि तामिळनाडूतून ही नदी पुढे समुद्राला मिळते.