Onam Photo : केरळच्या संस्कृतीचे खास वैशिष्ट्य असलेला 'ओनम'
केरळवासियांसाठी महत्वाचा सण म्हणजे ओनम. हा सण जगभरातील मल्याळम बांधवांकडून धुमधडाक्यात साजरा केला जातो. ओनम म्हणजे केरळच्या नवीन वर्षाची सुरुवात असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक आख्यायिका सांगितली जाते. बळीराजाच्या आगमनानिमित्त आज त्याच्या स्वागतासाठी ओनमचा सण साजरा करण्यात येतो.
दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवातील महत्वाचा दिवस म्हणजे ओनम. शेतकऱ्यांच्या घरी धन-धान्यांची आरास येऊ दे यासाठीही आजच्या दिवशी पूजा करण्यात येते. या वर्षी हा सण 23 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
आजच्या दिवशी सर्व लोक नवनवीन कपडे परिधान करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी लोक पहाटे स्नान करुन देवदर्शन करतात.
पुक्काळम् (फुलांची रांगोळी) हे ओनमचे खास आकर्षण असते. प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते आणि भलीमोठी रांगोळी काढली जाते.
ओनमच्या निमित्ताने पारंपरिक खाद्यपदार्थ आणि गोड मेजवानीचाही बेत आखतात. शेतकऱ्यांच्या घरी धन-धान्यांची आरास येऊ दे यासाठीही आजच्या दिवशी पूजा करण्यात येते.
पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषत: केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकलीचे आयोजन केलं जातं.