Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघात मानवी चुकीमुळे? रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं अपघाताचं खरं कारण
ओडिशामध्ये झालेल्या भीषण अपघाताचं कारण समोर आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओडिशाच्या बालासोरमध्ये दोन एक्सप्रेस आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात 288 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
या रेल्वे अपघाताचं खरं कारण समोर आलं आहे. इलेक्ट्रॉनिक इंटर लॉकींग सिस्टीममुळे (Electronic Inter Locking System) घडल्याचं समोर आलं आहे.
या सिग्नल यंत्रणेत काही बदल केल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही माहिती दिली.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Minister of Railways of India) यांनी सलग दुसऱ्या दिवशी ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातस्थळी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे अपघाताचं कारणही सांगितलं आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केल्याचंही त्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं आहे की, अपघाताचे कारण शोधण्यात आलं आहे.
रेल्वे अपघाताला जबाबदार असलेल्यांची ओळख पटली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा मोठा खुलासा रेल्वेमंत्र्यांनी केला आहे.
ओडिशातील भीषण रेल्वे अपघातामागील खरं कारण समोर आलं आहे. प्राथमिक तपास अहवालानुसार, हा अपघात मानवी चुकीमुळे घडल्याचं समोर येत आहे.
सिग्नल चुकल्याने शेकडो निरपराधांना प्राण गमवावे लागले. ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी तीन गाड्यांची भीषण टक्कर झाली होती. या दुर्घटनेत 288 जणांना जीव गमवावा लागला, तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले.