Noida Twin Towers Demolished : महाकाय 'ट्विन टॉवर' मातीत, नऊ वर्षांची मेहनत अन् कोट्यवधींचा खर्च धुळीस
Noida Twin Towers Demolition : अखेर देशातील बहुमजली इमारत ट्विन टॉवर (Twin Tower) जमीनदोस्त झालं आहे.

Noida Twin Towers Demolished
1/9
नोएडातील महाकाय सुपरटेक ट्विन टॉवर (Supertech Twin Tower) मातीमोल झाले आहेत.
2/9
अवघ्या 12 सेकंदात ही इमारत जमीनदोस्त झाली आहे.
3/9
नऊ वर्षांची मेहनत आणि कोट्यवधीचा खर्च करून बांधलेले हे टॉवर्स काही सेकंदात मातीमोल झाले.
4/9
काही सेकंदामध्ये हे बहुमजली टॉवर्स कोसळले.
5/9
यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं. हे ट्विन टॉवर्स (Twin Tower) पाडण्यासाठी 46 जणांची टीम तयार करण्यात आली. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटकं लावण्याचं काम करत होती.
6/9
स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे हे दोन टॉवर जमीनदोस्त झाले. विशेष म्हणजे, बहुमजली टॉवर्स पाडल्यानंतर याचा मोठा ढिगारा तयार झाला आहे.
7/9
हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धूळच धूळ पसरली.
8/9
खरेदीदारांच्या तक्रारीनंतर कोर्टानं ट्विन टॉवर म्हणजे अॅपेक्स (32 मजली) आणि सियान टॉवर्स (29 मजली) पाडण्याचे आदेश दिले आहेत.
9/9
खरेदीदारांचा आरोप आहे की, हे टॉवर बनवताना नियम डावलण्यात आले आहेत.
Published at : 28 Aug 2022 02:50 PM (IST)