Noida Twin Towers : असं आहे 'ट्विन टॉवर', थोड्याच वेळात होणार जमीनदोस्त, पाडकामाची तयारी अंतिम टप्प्यात
नोएडातील (Noida) अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) पाडले जाणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले आहे. हे ट्विन टॉवर (Twin Tower) पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत आहे. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटकं लावण्याचं काम करत आहे.
स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे हे दोन टॉवर जमीनदोस्त होतील.
विशेष म्हणजे, 32 मजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार होईल. हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धूळ पसरेल.
धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिओ फायबर शीट्स बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीनं झाकण्यात आलं आहे. जमीनदोस्त होणारी देशातील ही पहिली उंच इमारत असेल.
उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, गेल्या अनेक महिन्यांपासून नोएडास्थित सुपरटेक ग्रुपच्या प्रोजेक्ट एमराल्ड कोर्टचे 2 बांधकाम सुरू असलेले टॉवर पाडण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
खरेदीदारांच्या तक्रारीनंतर कोर्टानं अॅपेक्स आणि सियान टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले आहेत. बिल्डरनं बांधलेली घरं खरेदी करणं म्हणजे, ग्राहकांसाठी मोठी फसवणूक ठरली.
त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेलं. आता न्यायालयावं हे टॉवर्स पाडण्यास मंजुरी दिली आहे.
खरेदीदारांचा आरोप आहे की, हे टॉवर बनवताना नियम डावलण्यात आले आहेत.