New Delhi: दिल्लीकरांसाठी नवंकोरं G20 पार्क; कलाकृतींनी भरलेल्या पार्कातही मारता येणार फेरफटका, पाहा फोटो
दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी या पार्कचं उद्घाटन केलं. या पार्कमध्ये विविध प्राणी-पक्षांच्या आकर्षक कलाकृती साकारण्यात आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appललित कला अकादमीच्या कलाकारांनी या कलाकृती विकसित केल्या आहेत.
नवी दिल्ली नगरपरिषदेने कौटिल्य मार्गावर हे भव्य पार्क उभारलं आहे. चाणक्यपुरीत हे पार्क आहे.
दैनंदिन जीवनात फेकल्या जाणार्या ऑटोमोबाईल्स आणि बांधकाम साइट्सचे स्क्रॅप (मेटल स्क्रॅप) वापरून वेस्ट टू आर्ट पार्क विकसित केलं गेलं आहे.
भंगारात टाकलेल्या धातूंपासून या कलाकृती बनवण्यात आल्या आहेत.
या कलाकृतींमध्ये कॅनेडियन बीव्हर, तुर्की रेडविंग, जपानी ग्रीन तितर, दक्षिण आफ्रिकन स्प्रिंगबोक, जर्मन गरुड, इंडोनेशियन कोमोडो ड्रॅगन, फ्रेंच गॅलिक कोंबडा आणि अर्जेंटाइन प्यूमा या पक्षांचा समावेश आहे.
या उद्यानात प्रदर्शित करण्यात आलेल्या पक्षी आणि प्राण्यांमध्ये भारतीय मोर देखील आहे.
चिमणी, अमेरिकन बायसन, ब्राझिलियन जग्वार, चीनचा लाल-मुकुट असलेला क्रेन, सौदी अरेबियाचा उंट, कोरियन मॅग्पी, ऑस्ट्रेलियन कांगारू यांचा देखील या कलाकृतीत समावेश आहे.
रशियन ग्रिझली अस्वल, मेक्सिकन गोल्डन-ईगल, ग्रेट ब्रिटनचा सिंह देखील पार्कात पाहायला मिळतो.
पार्कातील सिंहाची कलाकृती फार आकर्षक आहे.
लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले की, राष्ट्रीय राजधानी सजवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले आहेत.
हे सुंदर उद्यान त्या दिशेने केलेल्या प्रयत्नांचं फळ आहे.
हे उद्यान दिल्लीकरांसाठी एक अनमोल भेट आहे.
image 9
ते म्हणाले की, दिल्ली हे आजवर दुर्लक्षित शहर होतं आणि आता नवनवीन थीम आणि गोष्टींद्वारे त्याचं सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.