IRCTC Tour: ईशान्य भारत फिरण्यासाठी आईआरसीटीसीची भन्नाट टूर, एवढा असेल खर्च
ईशान्यकडील देश हे केवळ भारतातच नाही तर परदेशातही खूप प्रसिद्ध आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हालाही जर तिथलं सौंदर्य अनुभवयाचं असेल तर भारतीय रेल्वे तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आलयं.
या पॅकेजद्वारे तुम्ही 4 डिसेंबर ही यासाठी तारीख असणार आहे.
हे संपूर्ण पॅकेज 7 दिवस आणि 6 रात्रीचे आहे.
या पॅकेजमध्ये तुमचा प्रवास चंढीगडपासून सुरु होईल.
तुम्ही विमानाने चंडीगढ ते गुवाहाटी असा प्रवास करु शकाल.
यामध्ये तुम्हाला गुवाहाटी, शिलाँग, चेरापुंजी, मौलिनॉन्ग, काझीरंगा येथे जाण्याची संधी मिळेल.
या पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स, न्याहारी आणि रात्रीचे जेवण आणि थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात येणार आहे.
या पॅकेजमध्ये एकट्याने प्रवास करण्यासाठी तुम्हाला 66,490 रुपये मोजावे लागणार आहेत.
तर दोन लोकांसाठी 48,530 रुपये आणि तीन लोकांसाठी 45,460 रुपये मोजावे लागतील.