Nehru Memorial: नेहरु संग्रहालयाचं नाव बदण्याच्या निर्णयावर राष्ट्रपतींनी केलं शिक्कमोर्तब, आता पंतप्रधान संग्रहालय म्हणून ओळखलं जाणार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेहरु मेमोरियल संग्रहालय आणि पुस्तकालयाचे नाव बदलण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया संग्रहालयाचे नाव पंतप्रधान संग्रहालय करण्यास राष्ट्रपतींनी मंजूरी दिली आहे.
14 ऑगस्ट रोजी या संग्रहालयाचे नाव बदलण्यासाठी अधिकृतरित्या परवानगी देण्यात आली होती.
नवी दिल्लीतील तीन मूर्ती भवनात हे संग्रहालय आहे.
तीन मूर्ती भवन हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे अधिकृत निवासस्थान आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संग्रहालयाच्या नाव बदलाची संकल्पना मांडली होती.
या संग्रहालयामध्ये आता भारताच्या पंतप्रधानांच्या कार्याविषयी देखील माहिती उपलब्ध होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मांडलेल्या या संकल्पनेला नेहरु परिषदेने देखील मान्यत दिली होती.
या संग्रहालयाच्या नामांतराचा निर्णय भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून घेण्यात आला होता.
तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या निर्णयाची अंमलबजावणी देखील करण्यात आली होती.