LokSabha Election : इंदिरा गांधीपासून ते अटलबिहारी वाजपेयींपर्यंत, याआधी देखील झाल्या आहेत वेळेआधी लोकसभेच्या निवडणुका
सध्या असलेल्या लोकसभेच्या कार्यकाळ हा मे 2024 पर्यंत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे एनडीएच्या सरकार हे वेळेआधी लोकसभेच्या निवडणुका घेणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्या आहेत.
पण जर लोकसभेच्या निवडणुका वेळेआधी लागल्या तर ही काही पहिलीच वेळ नसणार आहे वेळेआधी निवडणुका लागण्याची.
1971 च्या सुरुवातीला इंदिरा गांधींनी लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच निवडणुका घेण्याची शिफारस केली होती.
त्यानंतर पाचव्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला 352 जागांसह प्रचंड बहुमत मिळाले होते.
31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींना अंतरिम पंतप्रधान बनवण्यात आले.
त्यानंतर त्याच वर्षी राजीव गांधी यांनी लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका झाल्या होत्या.
1999 मध्ये बहुमत मिळवल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी 2004 मध्ये लवकर निवडणुकाही घेतल्या होत्या.
आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या दबावाखाली तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी निवडणुका वेळेआधीच पार पाडल्या, असं म्हटलं जातं.
त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांच्या कालावधीमध्ये देखील निवडणुका या वेळेआधी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.