Independence Day 2024: भारत स्वतंत्र होण्याचा रोमांचकारक इतिहास; अभिमान वाटेल 'अशी' स्वातंत्र्यवीरांची गाथा
15 ऑगस्ट 2024 ला भारत देश 77 व्या वर्षाला मागे टाकून 78 व्या वर्षात पदार्पण करत आहे.भारत देश स्वतंत्र होण्याचे स्वप्न हे शिवाजी महाराजांच्या काळापासून पाहिले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1800 मध्ये इंग्रज भारतात आले, त्यांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केले.1857 साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरोधात पहिले युध्द झाले.
अथक प्रयत्नांनी भारत 1947 ला भारत इंग्रजांच्या राज्यातून मुक्त झाला.15 ऑगस्ट 1947 ला पहिले ध्वजारोहण करण्यात आले.
विशेष म्हणजे इंग्रजांचा ध्वज उतरवून अतिशय अभिमानाने भारताचा तिरंगा फडकावण्यात आला.पहिला ध्वजारोहणाचा मान स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना देण्यात आला.
हा दिमाखदार सोहळा लाल किल्ल्यावर पार पडला.स्वतंत्र भारत देशाचे काम चालू असतानाच 22 जुलै 1947 ला भारतीय तिरंग्याची निर्मिती करण्यात आली.
या राष्ट्रध्वजाला मान्यता संविधान सभेत दिली होती.तिरंगा निर्माण करताना विशेष गोष्टींची दखल घेण्यात आली होती.
यामध्ये असे रंग निवडण्यात आले, ज्यातून भारतीय भूमिका आणि भारतीयांचे जनजीवन ओळखता येईल.'जन गण मन' हे भारत देशाचे राष्ट्र गीत लिहण्याची जबाबदारी रविंद्र टागोर यांच्याकडे गेली आणि 1911 साली याची निर्मिती झाली.
भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून अशोक स्तंभाला 26 जानेवारी 1950 ला घोषित करण्यात आले.भारत देश स्वतंत्र होण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या आहुत्या दिल्या गेल्या आणि आज या सर्वांना आदराने आणि अभिमानाने स्मरण केले जाते.