Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुन्हा एक भीषण अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीला धडकली; अंगावर काटा आणणारे Photo's
देशात रेल्वे अपघात होण्याच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीयेत. सातत्याने रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशातच तामिळनाडूमध्ये शुक्रवारी (11 ऑक्टोबर) रात्री उशिरा एक मोठा रेल्वे अपघात झाला.
म्हैसूर दरभंगा बागमती एक्स्प्रेस ट्रेन (12578) म्हैसूरहून बिहारच्या दरभंगाला जाणारी चेन्नईजवळील कावरप्पेट्टाई रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीला धडकली.
सदर अपघातामुळे जवळपास 12 ते 13 रेल्वे डब्बे रुळावरुन खाली घसरले.
अपघात झाल्यानंतर दोन ते तीन रेल्वे डब्यांना आग लागली.
या अपघातात आतापर्यंत 19 जण जखमी झाले आहेत.
एक्सप्रेस ट्रेन आणि मालगाडी यांच्यात झालेल्या धडकेत सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे रेल्वे बोर्डाने म्हटले आहे.
चेन्नई विभागातील पोनेरी कावरप्पेट्टाई रेल्वे स्थानकांवर सध्या (चेन्नईपासून 46 किमी) दुरुस्तीचे काम सुरू आहे.
22 डब्यांच्या या ट्रेनमध्ये स्लिपर क्लासचे 6 डबे, थर्ड एसीचे डबे, सेकंड एसीचे 2 डबे, इकॉनॉमिक क्लासचा 1 डबा आणि जनरल क्लासचे 3 डबे सोबत पॅन्ट्री कार आणि पॉवर कार होती.