नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
उद्योगपती एलॉन मस्क हे नाव भारतात चर्चेत आले ते ट्विटरच्या विक्रीनंतर, कारण एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केलं अन् भारतीय नेटीझन्सच्या घरापर्यंत हे नाव पोहोचलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, एलॉन मस्क जगातील गर्भश्रीमंत आणि पहिल्या 5 श्रीमंतांच्या यादीत असलेलं नाव आहे. टेस्ला या अफलातून अलिशान कार कंपनीचे ते सर्वेसर्वा आहेत.
एलॉन मस्क यांच्या टेस्ला कारने आता रोबोटॅक्सीचं लाँचिंग केलंय. विशेष म्हणजे एलॉन मस्क यांनी स्वत: या कारची सफर केली असून ही कार मानविहरीत असून ऑटोमॅटीक ड्राईव्ह करणारी कार आहे.
रोबोटॅक्सी या नावातच ही कार रोबोद्वारे ऑपरेट होणारी, चालणारी कार असल्याचं लक्षात येतं, लॉस एंजिलिस येथील टेस्लाच्या रोबो इव्हेंटनंतर या कारचा व्हिडिओ आणि फोटो माध्यमातून समोर आले आहेत.
येथील कार्यक्रमात बोलताना, 2026 साली रोबोटॅक्सीचं प्रोडक्शन सुरू केलं जाईल, असं एलॉन मस्क यांनी सांगितलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमातून रोबोबसची झलकही जगाला दाखवण्यात आलीय. या बसमधून एकावेळी 20 जण प्रवास करु शकतात.
रोबोटॅक्सीमध्ये दोन जणांच्या बसण्याची व्यवस्था असू्न अतिशय अलिशान अशी ही ड्रायव्हरविरहित कार आहे. सध्या केवेळ प्रोटोटाईप म्हणून नव्या डिझाईनमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे.
रोबो टॅक्सीला मोबाईल फोनप्रमाणे वायरलेस चार्जरद्वारे चार्जिंक केलं जाऊ शकेल, या कारचे दरवाजेही ऑटोमॅटीक असून ते उघडण्यासाठी कुठल्याही मानवाची गरज नाही.
एलॉन मस्क यांनी या कारसह मीडियाला पोझ देऊन कारमध्ये बसून प्रवास केल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.