Independence Day 2021 Photos: स्वातंत्र्याच्या उत्सवाचे हे फोटो पाहुन तुमचाही उर भरुन येईल, जय हिंद!
सध्या देशभरात 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. सामान्य नागरिकांपासून ते सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांनीही उंच टेकड्यांवर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचा गौरव असलेल्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. देशातील स्वातंत्र्य दिनाची ही अप्रतिम छायाचित्रे पहा. वंदे मातरम.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 8 व्या वेळी तिरंगा फडकवला. यानंतर त्यांनी सुमारे दीड तास देशाला संबोधित केले.
पंतप्रधान मोदींच्या वतीने ध्वजारोहण करताना भारतीय हवाई दलाची शक्तीही दिसून आली.
भारतीय हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टर्सनी आज प्रथमच लाल किल्ल्यावर फुलांचा वर्षाव केला.
यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिवस साजरे करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
आपल्या भाषणात, पीएम मोदींनी अनेक घोषणा केल्या आणि म्हणाले की आता भारत पूर्वीपेक्षा वेगाने प्रगती करत आहे.
लाल किल्ल्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, संरक्षण सचिव अजय कुमार आणि तीन सैन्यदलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या जवानांनी लडाखमधील पांगोंग त्सोच्या काठावर स्वातंत्र्यदिन साजरा केला.
या दरम्यान, आयटीबीपीच्या जवानांनी हातात तिरंगा धरला आणि परेड केली आणि राष्ट्रगीत गायले.
भारताचे स्वातंत्र्य केवळ देशातच नाही, तर लष्कराने परदेशातही साजरे केले.
व्हिएतनाममधील भारतीय नौदलाच्या जवानांनी भारताचे राष्ट्रगीत गाऊन आणि सकाळी ध्वजारोहण करुन साजरा केला.