In Pics : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारी
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देश, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. संपूर्ण देशात, देशभक्तीचे चैतन्यमयी वातावरण आहे. (pti gallery)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्या, म्हणजेच 15 ऑगस्ट 2021 ला, या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन मुख्य सोहळा होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर ते लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करतील. (pti gallery)
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनालाही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (pti gallery)
(pti gallery)
भारत सरकारच्या विविध मंत्रालयांद्वारे तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह, सैन्यदले आणि जनताही देशभरात, गेल्या काही दिवसांपासून या ऐतिहासिक प्रसंगानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत (pti gallery)
पंतप्रधानांना मानवंदना देणाऱ्या पथकात, लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलिस यांचा प्रत्येकी एक अधिकारी आणि 20 जवान या पथकात असतील. (pti gallery)
यावर्षी भारतीय नौदल समन्वय सेवा म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. मानवंदना पथकाची कमान कमांडर पीयूष गौर यांच्याकडे आहे. पंतप्रधानांच्या नौदल मानवंदना पथकाचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर सुने फोगट करतील तर लष्कराच्या पथकाचे नेतृत्व मेजर विकास संगवान करतील. (pti gallery)
हवाई दल तुकडीचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर ए बेरवाल करतील. दिल्ली पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त पोलिस उप महासंचालक (पश्चिम जिल्हा) सुबोध कुमार गोस्वामी करतील.
(pti gallery)