In Pics : पत्नीचे दागिने विकून रुग्णांसाठी 'त्या' रिक्षाचालकानं रिक्षाची केली रुग्णवाहिका
कोरोना काळात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आणि मग रुग्णसेवेसाठी अनेकजणांनी हातभार लावण्यास सुरुवात केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुग्णवाहिकेपासून ते अगदी ऑक्सिजन सिलेंडरपर्यंत प्रत्येकानं आपल्या परिनं रुग्णसेवेत योगदान दिलं.
मध्य प्रदेशमध्ये जावेद खान या रिक्षा चालकाने आपल्या पत्नीचे दागिने विकून रिक्षाचं रुपांतर एका रुग्णवाहिकेमध्ये केलं आहे, यातून ते रुग्णांची ने - आण करण्यासाठी ते कोणत्याही प्रकारे पैसे घेत नाहीत.
रुग्णांना रग्णालयात नेण्यासाठी कोणत्या अडचणी येतात, त्यांची त्यावेळी काय अवस्था होते हे आपण सोशल मीडियावर पाहिलं आणि त्यामुळं यातूनच ही अशा प्रकारची रुग्णवाहिका करण्याची कल्पना मला सुचली, असं जावेद म्हणतात.
मागील 15- 20 दिवसांपासून जावेद रुग्णांना त्यांच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयांमध्ये नेत आहेत. यामध्ये 9 गंभीर अवस्थेतील रुग्णांचाही समावेश होता. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)