In Pics : ऑक्सीजन वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी एअर फोर्सकडून रिकाम्या ऑक्सिजन कंटेनरची विमानाने वाहतूक
कोविड -19 विरोधातील लढ्याचा भाग होऊन भारतीय हवाई दल, ऑक्सिजन भरून आणण्यासाठी लागणारा वेळ वाचावा आणि कोविड -19 विरोधातील लढ्याचा भाग होऊन भारतीय हवाई दल महाराष्टातील रिकामे ऑक्सिजन कंटेनर ऑक्सिजन केंद्रावर नेण्यासाठी विमानाचा वापर करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज 24 एप्रिल 2021 रोजी सकाळी 08:00 वाजता हिंडन हवाई तळावरून भारतीय हवाई दलाच्या एका सी -17 विमानाने पुणे हवाई तळाच्या दिशेने उड्डाण केले. सकाळी 10:00 वाजता या विमानाचे पुण्यात आगमन झाले.
द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनची वाहतूक करणारे रिक्त कंटेनर ट्रक्स वेळेची बचत करण्यासाठी विमानातून नेत आहेत .
पुण्याहून हे विमान सुटेल आणि हे कंटेनर आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत जामनगर हवाईतळावर उतरवण्यात आलं.
भारतीय हवाई दलाने तैनात केलेल्या आणखी एका सी -17 विमानाने आज पहाटे 2 वाजता सिंगापोर येथील चांगी आंतराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी उड्डाण केले. सकाळी 07:45 वाजता या विमानाचे सिंगापोरला आगमन झाले.
क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकचे चार कंटेनर भरल्यानंतर ते सिंगापोरहून उड्डाण करेल आणि पश्चिम बंगालमधील पनागढ़ हवाईतळावर दाखल होईल आणि संध्याकाळपर्यंत हे कंटेनर उतरविण्यात येतील.