Millet Food Festival: संसदेभवनात भरड धान्यांची मेजवानी; पीएम मोदींसह खासदारांनीही घेतला आस्वाद
Millet Food Festival: दिल्लीमध्ये संसद भवन परिसरात इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्सचं आयोजन करण्यात आलं आहे. या फुड फेस्टिवलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह खासदारांनी भरड धान्यापासून बनवलेल्या खास पदार्थांची चव चाखली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीत मंगळवारी 'इंटरनेशनल ईयर ऑफ मिलेट्स' निमित्त संसद भवन संकुलात मिलेट्स (बाजरी) विशेष मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष मेजवानीत पंतप्रधान मोदींसह सर्व खासदारांनी भरड धान्यापासून बनवलेल्या खास पदार्थांचा आस्वाद घेतला.
पंतप्रधान मोदींसह लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनी या पदार्थांच्या चवीचं कौतुक केलं. बाजरी मेजवानीचा कार्यक्रम कृषी मंत्रालयानं आयोजित केला होता. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बाडमेर संघानं बाजरीचे खास पदार्थ तयार केले.
कृषी मंत्रालयाकडून मंगळवारी संसद भवनात बाजरीची मेजवानी देण्यात आली. भरड धान्यांपासून (ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांसारखी पौष्टिक भरड तृणधान्ये) विविध प्रकारचे पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात आले.
बाजरीपासून वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात आलेले. पंतप्रधान मोदींसह सर्वच खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, आज संसद भवनात राजस्थान राज्याची झलक पाहून मी रोमांचित आणि भावूक झालोय. लहानपणापासून आपण रोजचा आहार म्हणून बाजरीची भाकर खातोय.
मंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, आपले खाद्यपदार्थ त्याच्या पौष्टिक मूल्य आणि चवीमुळे जगभरात नावाजले आहेत. धान्य आपल्याला पौष्टिक आहार देऊन निरोगी आणि उत्साही ठेवतात .
2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष' म्हणून घोषित करण्यात आलंय. मार्च 2021 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं भारतानं दिलेला प्रस्ताव एकमतानं स्वीकारला. भारताच्या प्रस्तावावर, 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष' म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
जगातील 70 हून अधिक देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बाजरी देश आणि जगापर्यंत पोहोचवणं आपल्या सर्वांच्या सहभागानं शक्य आहे.