महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांसह 'या' नेत्यांनी वाहिली आदरांजली, पाहा फोटो
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राजघाटावर आदरांजली वाहिली.
देशसेवा करताना हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.
महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, “या पुण्यतिथीप्रसंगी बापूंना नमन करत त्यांच्या मी उदात्त विचारांचे स्मरण करतो. देशसेवा करतांना हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही मी आदरांजली वाहतो. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही, विकसित भारत घडवण्याच्या आपल्या संकल्पाला ते दृढ करत राहतील.”
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.
राष्ट्रपती भवनाने एक फोटो शेअर करत आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शहीद दिनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आणि त्यांनी राजघाटावर सर्व धर्मांच्या प्रार्थनेत भाग घेतला.
उपराष्ट्रपती कार्यालयाने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हवाल्याने ट्वीट केले की, “शहीद दिनी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण. या निमित्ताने आपणही असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करूया आणि सशक्त आणि अखंड भारत निर्माण करण्याची शपथ घेऊया.
महात्मा गांधी यांना आदरांजली वाहताना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना नमन करतो.