Congress Bharat Jodo Yatra: लहानपण देगा देवा... राहुल आणि प्रियंका गांधींनी लुटला बर्फवृष्टीचा आनंद, फोटो व्हायरल
राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी जम्मू-काश्मीरमधील बर्फवृष्टीचा आनंद लुटला. यावेळी एकमेकांवर बर्फ फेकतानाचा आनंदी क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबर्फवृष्टी पाहून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना बर्फात खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकले.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे काही फोटो समोर आले आहेत.
या फोटोंमध्ये भाऊ-बहिण एकमेकांवर बर्फ फेकताना दिसत आहेत.
कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झालेल्या काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रेचा' आज काश्मीमध्ये समारोप झाला.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा 14 राज्यांमधून प्रवास करत जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाली.
आज काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेची सांगता झाली.
यावेळी राहुल गांधी यांनी जनसंबोधन केलं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जोरदार बर्फवृष्टी सुरू असतानाही राहुल गांधी यांनी आपलं भाषण सुरुच ठेवलं.
हे दृश्य पाहताना राष्ट्रवादी काँग्रेसचेस अध्यक्ष शरद पवार यांच्या भरपावसातील भाषणाची आठवण झाली.
श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी मौलाना आझाद रोडवरील पक्षाच्या मुख्यालयात तिरंगा फडकवला.
शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर जाहीर सभेनंतर या मोर्चाची आज सांगता झाली आहे.
राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान 4 हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे.