Maharashtra Chitrarath 2023 : महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा मान! पाहा पहिल्या क्रमांकावर कोणता चित्ररथ?
प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला (Maharashtra Chitrarath 2023) दुसरा क्रमांक मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर उत्तराखंडचा चित्ररथ पहिल्या क्रमांकावर राहिलाय.
उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
17 राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय.
‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’यावर अधारित चित्ररथ होता.
या चित्ररथाच्या समोर गोंधळी होते. गोंधळींचं जे प्रमुख वाद्य आहे संबळ हे या ठिकाणी दाखवलेलं आहे.
हे सगळे तुळजाभवानीचे गोंधळी चित्ररथाच्या समोर आहेत. त्याच्या मागे साडेतीन शक्तीपीठं म्हणजेच
कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा दाखवण्यात आला आहे.
ही सगळी शक्तीपीठं म्हणजे नारीशक्तीचा सन्मान होय.
पोतराजसुद्धा चित्ररथाच्या होते.
एकूणच महाराष्ट्राची लोककला या ठिकाणी सादर करण्यात आली होती.