Lucknow Rain: लखनौमध्ये पावसाचा हैदोस; वीज आणि झाडं पडून रस्तेही खचले, पाहा भीषण फोटो
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये मुसळधार पावसामुळे बहुतांश भागात पाणी भरलं आहे. राज्याच्या मध्यवर्ती भागात काही ठिकाणी शाळा देखील दिवसभर बंद ठेवण्यात आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशची राजधानी लखौमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील घरं पाण्याखाली आहेत, रस्त्यावरुन ये-जा करणंही मुश्किल झालं आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यातील 10 जिल्ह्यांतील 19 तालुक्यांना पुराचा तडाखा बसला आहे.
मथुरेतही मुसळधार पावसाने कहर केला आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास होत आहे.
सततच्या पावसामुळे उत्तर प्रदेशमधील अनेक रस्ते खचले आहेत.
अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याने रस्त्याचंही नुकसान झालं आहे, वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे.
लखनौमधील गोमती नगरच्या आंबेडकर पार्कमध्ये वीज पडल्याने हत्तीच्या दगडी पुतळ्याचा समोरचा भाग खराब झाला.
आंबेडकर उद्यानात बसवण्यात आलेल्या हत्तीच्या पुतळ्यावर वीज पडून नुकसान झालं. विजेच्या धक्क्याने हत्तीच्या मुर्तीचा तुकडा तुटून जमिनीवर पडला, त्यामुळे ग्रॅनाइटच्या फरशीवर 10 इंच रुंद छिद्र निर्माण झालं.
उत्तर प्रदेशमधील अनेक रेल्वे मार्ग पाण्याखाली आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान होत आहे. रस्तेही खराब होत आहेत.
15 सप्टेंबरपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यातील 10 जिल्ह्यांतील 19 तालुक्यांना पुराचा तडाखा बसला आहे.