Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी हवाई दलाच्या विशेष विमानानं भारतात परतल्या; पाहा फोटो
भगवान बुद्ध आणि त्यांचे शिष्य सारिपुत्त आणि महामोग्गलांन यांचे पवित्र अस्थी दिल्लीतील पालम हवाई दलाच्या तळावर आणण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी या वेळी उपस्थित होत्या.
23 फेब्रुवारी रोजी बँकॉकमधील सनम लुआंग पॅव्हेलियन येथे भगवान बुद्ध, शिष्य सारिपुत्त आणि महामोग्गलांन यांच्या अस्थी खास बांधलेल्या मंडपात स्थापित करण्यात आले.
भगवान बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांचे पवित्र अवशेष कुम लुआंग, रॉयल रुजाप्रुक, चियांग माई, वाट महा वनारम, उबोन रतचथानी, वाट महा थाट, ओलुयुक आणि क्राबी येथे प्रदर्शित करण्यात आले.
भगवान बुद्ध, त्यांचे शिष्य सारिपुत्त आणि महामोग्गलांन यांचे पवित्र अवशेष एकत्र प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे.
भगवान बुद्ध आणि त्यांच्या दोन शिष्यांचे चार पवित्र पिप्रहवा अवशेष भारतात सुरक्षीत आहेत.