Ethanol : 15 दिवसात इथेनॅाल दरात दुसऱ्यांदा वाढ
तांदूळ आणि मक्यापासून बनवल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात (Ethanol Price) प्रतिलिटर तीन रुपये 71 पैशांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवाढ केल्यामुळं तांदळापासून तयार होणारं इथेनॉल 64 रुपये लिटर तर मक्यापासूनचे 66 रुपये लिटरला मिळणार आहे.
केंद्र सरकारनं 2025 पर्यंत 20 पेट्रोलमध्ये टक्के इथेनॉल (Ethanol) मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीनं सरकारचे प्रयत्न देखील सुरु आहेत.
2023 पर्यंत पेट्रोलमध्ये 12 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य टेवण्यात आले होते. पण सध्या 11.77 टक्के इथेनॉल मिसळले जाते.
पंधरा दिवसात दुसऱ्यांदा केंद्र सरकारनं इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं ७ ऑगस्ट रोजीच तांदळापासूनच्या इथेनॉलला 4 रुपये 75 पैसे, तर मक्यापासूनच्या इथेनॉलला 6 रुपये 1 पैशाची वाढ केली होती.
इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इथेनॉल मिश्रणाचा वेग कायम ठेवण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्र सरकार आता मक्याला प्रोत्साहन देत आहे. मक्यापासून तयार केलेल्या इथेनॉलच्या किमतीत वाढ केल्यास नफा वाढण्यास हातभार लागणार आहे.
31 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या चालू हंगामात, तेल विपणन कंपन्यांना धान्य-आधारित डिस्टिलरीजमधून 21.25 कोटी लिटर इथेनॉल खरेदी करावे लागेल. मात्र आत्तापर्यंत डिस्टिलरींनी केवळ 9.52 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
तांदूळ आणि मक्यापासून 21.25 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.