Manipur Violence: साधारण दोन महिन्यापासून मणिपूर हिंसेनं होरपळत, पाहा राज्यातील सद्यस्थिती
मणिपूरमध्ये मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळावा, यासाठी 3 मे रोजी 'आदिवासी एकता मार्च' काढण्यात आला होता. यादरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसा भडकली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुप्रीम कोर्टानं सोमवारी, 3 जुलै रोजी मणिपूर सरकारला जातीय हिंसाचारानं प्रभावित राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी कोणकोणती पावलं उचलण्यात आली आहेत. याचा अहवाल देण्यासाठी सांगितलं आहे. यासाठी राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं की, राज्यातील परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचं न्यायालयाला सांगितलं आहे.
मणिपूर पोलिसांशिवाय, राज्यात भारतीय राखीव दल, मणिपूर रायफल्स, सीआरपीएफच्या (केंद्रीय सशस्त्र पोलीस दल) 114 तुकड्या आणि भारतीय लष्कराच्या 184 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
साधारण दोन महिन्यापूर्वी मणिपूरमध्ये जातीय हिंसेला सुरुवात झाली. यामुळे राज्यातील बंद करण्यात आलेले पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बुधवारी, 5 जुलै रोजी विद्यार्थांसाठी पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यानी माहिती देताना सांगितले की, घाटी भागातील जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या छावण्या हटवण्यात येतील.तसेच मैईती आणि कुकी या दोन्ही समुदायाच्या शेतकऱ्यांना सुरक्षा दिली जाईल. कारण शेतीची कामे सुरू करता येतील.
हिंसेच्या आगीत होरपळणाऱ्या मणिपूरमधील आर्थिक व्यवहार जवळपास ठप्प आहे. याचा व्यापारी वर्गावर परिणाम झाला आहे.
मणिपूरमधील थौबल जिल्ह्यात मंगळवारी, 4 जुलै रोजी भारतीय राखीव दलाच्या शिबिरातून (आयआरबी ) सशस्त्र जमावानं शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सुरक्षा दला सोबत झालेल्या झटापटीत एका 27 वर्षीय युवकाचा मृत्यूमुखी पडला. तर आसाम रायफल्सचा एक सैनिक जखमी झाला.
दुसरीकडे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी सकाळी राज्यातील दोन वेगवेगळ्या भागात जोरदार गोळीबार झाला. परंतु, या गोळीबारात कोणती जीवितहानी झाल्याची माहिती मिळू शकली नाही.
भारतीय युवक काँग्रेसनं केंद्र सरकार मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात सपेशल अपयशी ठरल्याचा आरोप केला. यासोबत राज्यातील भाजप सरकारला बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप फुटीरतावादी राजकारण करत काश्मीर आणि मणिपूर राज्याला 'उद्ध्वस्त' केल्याचा आरोप केला आहे.यासोबतच त्यांनी असा दावा केला की, आता पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून फुटीरतावादी गटांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचं सांगितलं.