Relationship Tips: 'या' 7 सवयी अवलंबल्यास जोडीदारासोबत नाही होणार वाद; वाढेल प्रेम
नात्यात प्रेम टिकवायचं असेल तर एकमेकांचा आदर केला पाहिजे, आदराशिवाय कोणतंही नातं जास्त काळ टिकू शकत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनातं घट्ट होण्यासाठी जोडीदाराच्या कामाचं कौतुक करा, असं केल्यास जोडीदाराला आनंद मिळतो आणि नात्यात गोडवा टिकून राहतो.
अनेकदा आपण जोडीदाराला आपल्या मनासारखं बनवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे नात्यात वाढतो अन् हळूहळू नातं कमकुवत होत जातं. जोडीदाराच्या सवयी बदलण्यापेक्षा त्याच्याशी जुळवून घेणं चांगलं असतं.
तुमच्या जोडीदारावर नेहमी बंधनं लादू नका. कुठल्याही गोष्टीसाठी त्याला जास्त थांबवू नका. सततची बंधनं कोणत्याही व्यक्तीला त्रास देऊ शकतात आणि ते हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. तुम्हाला एखादी गोष्ट योग्य वाटत नसेल तरीही त्यावर जास्त भांडू नका, तीच गोष्ट प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्हाला नातं सुदृढ ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराचं ऐकलं पाहिजे. याचा अर्थ असा की, जेव्हा पार्टनर तुमच्याशी काही चर्चा करत असेल किंवा काहीतरी मनापासून बोलत असेल तेव्हा तुम्ही ते एकाग्रतेनं ऐकलं पाहिजे. अशा वेळी तुमचा फोन दूर ठेवा आणि जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा, काही समस्या असल्यास त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. महिन्यातून एक किंवा दोनदा चित्रपट पाहण्यासाठी जा. जर तुमच्या जोडीदाराला थिएटरमध्ये जायचं नसेल तर घरी चित्रपट पाहू शकता.
जर तुम्हाला प्रेम वाढवायचं असेल तर तुमच्या जोडीदारासोबत किचनमध्ये जेवण बनवा. अशा प्रकारे दोघांचं बॉन्डिंग मजबूत होईल आणि तुम्हाला एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी देखील मिळेल. यामुळे तुम्हाला सलोख्याची भावना मिळेल. आणि जोडीदाराच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन काम करता येईल.