Largest Residential Building : बकिंगहॅम पॅलेस किंवा अँटिलिया नाही, 'हे' आहे जगातील सर्वात मोठं घर, फोटोंमध्ये पाहा शाही घराचं सौदर्य
जगातील सर्वात मोठं घर म्हटलं तर तुम्हाला मुंबईतील अंबानींचा अँटिलिया बंगला किंवा मग बकिंगहम पॅलेस आठवेल. पण, जगात यापेक्षाही मोठं आणि शाही पॅलेस आहे. (PC:Google)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगातील सर्वात मोठं घर भारतात आहे. लक्ष्मी विलास पॅलेस हा राजवाडा गुजरातमधील वडोदरा शहरात आहे. (PC:Google)
लक्ष्मी विलास पॅलेस गायकवाड घराण्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी 1890 मध्ये बांधले होते. हा राजवाडा बांधण्यासाठी 12 वर्षे लागली. (PC:istock)
फायनान्शिअल एक्स्प्रेसनुसार, लक्ष्मी विलास पॅलेस ब्रिटनच्या बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चारपट मोठं आहे. त्याकाळी हे पॅलेस बांधण्यासाठी 1,80,000 पौंड खर्च आला होता. (PC:Google)
सध्या याची किंमत 24 हजार कोटींहून अधिक आहे. सध्या या राजवाड्यात समरजीतसिंह गायकवाड, त्यांची पत्नी राधिकाराजे गायकवाड त्यांच्या दोन मुलींसह राहतात. (PC:istock)
हे आलिशान घर सर्व लक्झरी सुविधांनी सुसज्ज आहे. यामध्ये गोल्फ कोर्स, महाल भोज, मोती बाग पॅलेस आणि महाराजा फतेह सिंग संग्रहालय आहे. (PC:istock)
सामान्य लोक लक्ष्मी विलास पॅलेस देखील पाहू शकतात. यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 150 रुपये शुल्क भरावं लागेल. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत तुम्ही हा राजवाडा पाहण्याचा आनंद घेऊ शकता. (PC:istock)
गुजरातमधील बडोद्याच्या राजघराण्यातील समरजितसिंह गायकवाड हे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. ते भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकटपटू आहेत. (PC:istock)
(PC:istock)
(PC:istock)
विराट कोहली, धोनी किंवा सचिन तेंडुलकर नाही, तर समरजितसिंह रणजितसिंह गायकवाड भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहेत. त्यांना वारसाहक्काने 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती मिळाली आहे. (PC:Google)