Ram Mandir : राम मंदिरात पुजारी होण्यासाठी 6 महिने खास प्रशिक्षण, त्यानंतरच नियुक्ती; ट्रेनिंगमध्ये खास काय? जाणून घ्या
Ram Mandir Inauguration : अयोध्येतील भव्य राम मंदिरातील पुजाऱ्यांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात आली आहे. (PC:PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे प्रभू रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरू आहे. दुसरीकडे, राम मंदिराच्या पुजाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल, त्यानंतरच त्यांची पुजारी पदासाठी निवड केली जाईल. (PC:PTI)
राम मंदिराच्या पुजाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुजाऱ्यांना सहा महिन्यांचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. (PC:PTI)
पुजारी पदांसाठी तीन हजारहून अधिक अर्ज आले होते, त्यापैकी 200 पुजाऱ्यांची मेरिट लिस्ट तयार करून त्यानंतर मुलाखती घेऊन 20 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. (PC:PTI)
अयोध्येतील कारसेवकपुरम येथे 200 उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पार पडली. अयोध्येतील दोन महंत मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय पॅनेलने या मुलाखती घेतल्या. (PC:PTI)
उमेदवारांचं सहा महिन्यांचं प्रशिक्षण धार्मिक अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. (PC:PTI)
प्रशिक्षणादरम्यान या उमेदवारांना राम मंदिर ट्रस्टकडून दरमहा दोन हजार रुपये पगार मिळणार आहे. यासोबतच त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थाही ट्रस्टकडून करण्यात येणार आहे. (PC:PTI)
ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सांगितलं की, प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर पुजारी आणि विविध पदांवर नियुक्त केलं जाईल. (PC:PTI)
अयोध्येतील भव्य राम मंदिराचं निर्माणकार्य शेवटच्या टप्प्यात आलं आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार असून याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. (PC:PTI)
ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, हिंदू धर्माचे विविध विषय आणि धर्मशास्त्रात प्राविण्य असलेले शिक्षक प्रशिक्षण देतील. (PC:PTI)
ट्रस्टने या आधीच स्पष्ट केलं होतं की, रामलल्लाची पूजा रामानंदी पंथानुसार केली जाईल, ज्यांचे पहिले आचार्य प्रभू राम होते. (PC:PTI)