G20 Summit: स्वागत, हास्य आणि जगाच्या चांगल्या भविष्याचं वचन; भारतातील G20 शिखर परिषदेचा प्रवास पूर्ण, पाहा सुंदर फोटो
राजधानी दिल्लीत दोन दिवसीय G-20 शिखर परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी ब्राझिलच्या राष्ट्रपतींना अध्यक्षपद सोपवलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी खास बातचीत देखील केली.
G20 मध्ये यंदापासून आफ्रिकन युनियनचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी पीएम मोदींनी आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष अझाली असौमानी यांची गळाभेट घेतली.
त्याच वेळी, शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व पाहुण्यांसाठी डिनरचं आयोजन केलं होतं. डिनरपूर्वी पंतप्रधान मोदींनी पाहुण्यांचं मंचावर स्वागत केलं. मोदींनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांचीही भेट घेतली. पंतप्रधान ज्या ठिकाणी उभे होते त्याच्या मागे प्राचीन नालंदा विद्यापीठाचं चित्र दिसत होतं.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या पत्नी युको किशिदा यांनी साडी नेसून डिनरला हजेरी लावली. तिने हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या साडीत रॉयल डिनरला हजेरी लावली होती.
डिनर इव्हेंटमध्ये इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या (IMF) MD क्रिस्टालिना जॉर्जिएवा भारतीय पोशाख सूट-सलवारमध्ये दिसल्या.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत सेल्फी घेतला.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सर्व जागतिक नेत्यांनी राजघाटावर पोहोचून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान मोदींनी सर्व नेत्यांना शाल देऊन त्यांचं स्वागत केलं.
परिषदेनंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेतली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचाही यात समावेश होता, यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची मोदींनी खास भेट घेतली.
या दोघांमध्ये परिषदेदरम्यान बराच वेळा चर्चा झाल्याचंही दिसून आलं.