गर्लफ्रेंडसोबत चार वर्षे रिलेशनशीप, कॅनडात जॉब, सगळं सोडलेल्या IIT बाबाचे जुने फोटो आले समोर!
सध्या कुंभमेळ्यात दिसलेल्या एका तरुणाची मुलाखत चांगलीच व्हायरल होत आहे. या तरुणाने आता अध्यात्माला जवळ केले असून तो स्वत:ला महादेवाच भक्त असल्याचे सांगतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष म्हणजे हा तरुण अतिशय उच्चशिक्षित आहे. त्याने एअरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले आहे. त्याने हे शिक्षण आयआयटी बॉम्बेमधून घेतलंय.
विशेष म्हणजे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाल्यानंतर त्याने फोटोग्राफी, डिझायनिंगचेही शिक्षण घेतले.
त्याने कॅनडात जाऊन महागडी नोकरीही केलेली आहे. मात्र या सर्व गोष्टींमध्ये मन न रमल्यामुळे त्याने सगळंकही सोडून शेवटी वैराग्य पत्करलंय.
आता तो साधू झाला आहे. त्याला सगळीकडे आयआयटी बाबा म्हटलं जातंय.
14 जानेवारीपासून त्याच्या अनेक मुलाखती समाजमाध्यमावर फिरत आहेत. त्याने अध्यात्माला जवळ का केलं, याची कथा तो यात सांगताना दिसतोय.
विशेष म्हणजे त्याने याच मुलाखतीतं मला एक गर्लफ्रेंड होती. या गर्लफ्रेंडसोबत मी चार वर्षे रिलेशनशीपमध्ये होतो, असंही तो सांगताना दिसतोय.
त्याने कॅनडात जाऊन मोठ्या पगाराची नोकरी केली आहे. या आयआयटी बाबाचे खरे नाव अभय सिंह असे असून त्याचे आता विद्यार्थीदशेतले काही फोटोच व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये तो आपल्या मित्रांसोबत बसलेला दिसत आहे. एका फोटोमध्ये तो पदवीदान समारंभात उभा असल्याचेही दिसत आहे.
काही फोटोंमध्ये हे आयआयटी बाबा आपल्या मित्रांसोबत गप्पा करतानाही दिसत आहे. त्यामुळे