Kochi Water Metro: कोची वॉटर मेट्रोच्या दुसऱ्या दिवशी 7,000 हून अधिक लोकांनी केला प्रवास, पाहा फोटो
केरळमध्ये सुरु झाली देशातील पहिली वॉटर मेट्रो. प्रवाशांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळणार याचा अंदाज सरकारला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोची वॉटर मेट्रोच्या दुसऱ्याच दिवशी 7000 हून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. 25 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याव वॉटर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले होते.
डब्ल्यूएमएलने दिलेल्या माहितीनुसार फीडर ऑटो आणि केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ फीडर बसेस या वॉटर मेट्रो टर्मिनल ते इन्फोपार्कपर्यंत पुरविण्यात आल्या आहेत.
बुधवारी, 6,559 लोकांनी कोची वॉटर मेट्रोच्या हायकोर्ट ते वायपिन मार्गावर प्रवास केला.
त्याचवेळी व्यतिला ते कक्कनड या दुसऱ्या मार्गावरही वॉटर मेट्रोचे ऑपरेशन सुरू करण्यात आले.
कोची वॉटर मेट्रो (KWML) ने प्रवाशांच्या आकडेवारीबाबत माहिती जारी केली आहे. त्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी दोन्ही मार्गावरील एकूण प्रवाशांची संख्या 7,039 होती.
मेट्रोच्या निवेदनात म्हटलंय की वॉटर मेट्रोवर आरामदायी प्रवास करताना प्रवासी नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात.
Vyttila-Kakkanad मार्गावरील तिकिटाची किंमत 30 रुपये आहे आणि हायकोर्ट ते वायपिन या मार्गाच्या तिकीटाची किंमत 20 रुपये आहे.
डब्ल्यूएमएलने दिलेल्या माहितीनुसार फीडर ऑटो आणि केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ फीडर बसेस या वॉटर मेट्रो टर्मिनल ते इन्फोपार्कपर्यंत पुरविण्यात आल्या आहेत.