Badrinath Dham :15 क्विंटल फुलांनी सजलं बद्रिनाथ धाम; आजपासून मंदिर भाविकासाठी खुलं, दर्शनासाठी हजारोंची गर्दी
केदारनाथनंतर आता बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंदिराला 15 क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आलंय. सकाळपासून बर्फ पडत असतानाही शेकडो भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी केली.
लष्करानं बँडची धून वाजवली तर भाविकांनीही दिल्या जय बद्री विशालच्या घोषणा देण्यात आल्या.
दरवाजे उघडण्यापूर्वीच पहिले शंकराचर्य अविमुक्तेश्वानंद मंदिरात पोहोचले होते.
आज बद्रिनाथचे दरवाजे उघडल्यानंतर खऱ्या अर्थाने चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे.
चारधाम यात्रेपैकी एक आणि महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या बद्रीनाथ धाम मंदिराचे दरवाजे पारंपरिक रितीरिवाजानुसार खुले करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मंदिरातील पहिली पूजा करण्यात आली.
मंदिराची द्वार खुली करण्याच्या प्रक्रियेसाठी संपूर्ण मंदिरावर झेंडुंच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे खुले झाल्यावर चारधाम यात्रेची औपचारिक सुरुवात झाल्याची घोषणा करण्यात आली.
प्रचंड थंडी असूनही मंदिराचे दरवाजे उघडताना हजारो भाविक बद्रिनाथ धाममध्ये पोहोचले आहेत.