Gruha Lakshmi Scheme 2023 : बेळगावात गृहलक्ष्मी योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा
कर्नाटक सरकार गृहलक्ष्मी योजने अंतर्गत कुटुंबातील एका महिलेला दरमहा दोन हजार रुपये देणार असून या योजनेचा अर्ज भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रत्येक कुटुंबातील एका महिलेला दरमहा दोन हजार रुपये कर्नाटक सरकार गृहलक्ष्मी योजनेद्वारे देणार आहे.
या योजनेचा शुभारंभ काही दिवसापूर्वी झाला असून अर्ज भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केल्याचे बेळगाव शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
बेळगाव वन या सेवा केंद्रात गृहलक्ष्मी योजनेचे अर्ज भरुन घेतले जात आहेत. अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिलांच्यात वादावाद होत आहेत.
मोलमजुरी तसेच नोकरीला जाणाऱ्या महिला देखील कामावर सुट्टी काढून अर्ज भरण्यासाठी रांगेत उभारत आहेत.
क अडचणी निर्माण होत असल्याने महिलांना तासनतास रांगेत उभारावे लागत आहे.
रस्त्यावर देखील महिलांची लांब रांग लागली होती. महिलांना दिवसभर रांगेत ताटकळत उभारावे लागत आहे.
त्यामुळे महिलांनी आणखी काऊंटर उघडण्याची मागणी केली आहे.