Tallest Ram Statue: जगातला सर्वात मोठा रामाचा पुतळा आंध्र प्रदेशात; अमित शाहांनी केली पायाभरणी, पाहा फोटो
कुरनूलजवळील नंदयाल जिल्ह्यातील मंत्रालयम येथे हा रामाचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रभू रामाचा हा 108 फूट उंचीचा विशाल पुतळा देशातील सर्वात मोठी राम मूर्ती असेल, असं अमित शाह म्हणाले.
आंध्र प्रदेशातील कुरनूल येथील राघवेंद्र स्वामी मठात बांधण्यात येणाऱ्या भगवान रामाच्या पुतळ्याची पायाभरणी गृहमंत्री अमित शहा यांनी व्हि़ीओ कॉलद्वारे केली.
श्री राघवेंद्र स्वामी मठाने भगवान रामाच्या या पुतळ्यासाठी 10 एकर जमीन दान केली आहे, जेणेकरून या भूमीवर देशातील सर्वात मोठी रामाची मूर्ती उभारता येईल.
हा पुतळा शिल्पकार राम वानजी सुतार बनवणार आहेत, ज्यांनी गुजरातमधील केवडिया येथे जगातील सर्वात मोठा पुतळा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची निर्मिती केली आहे.
केंद्रीय गृह अमित शाह म्हणाले की, तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेल्या मंत्रालयम गावात 10 एकर क्षेत्रात पसरलेला हा प्रकल्प अडीच वर्षात पूर्ण होईल.
गृहमंत्र्यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्री राम मंदिराची पायाभरणी करून त्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा केला आहे.
आता लवकरच श्री राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून शेकडो वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीराम स्वतःच्या घरी विराजमान होणार आहेत.
मंत्रालयम येथे श्री रामाच्या भव्य पुतळ्याच्या पायाभरणी प्रसंगी अमित शाहांनी संत राघवेंद्र स्वामी आणि दक्षिणेतील अत्यंत समृद्ध वैष्णव परंपरा आणि त्यातील सर्व संतांबद्दल आदर व्यक्त केला.