ABP C-Voter Survey: राहुल गांधी नाही, मग 2024 मध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रबळ उमेदवार कोण? ममता, नितीश की...? सर्वेक्षणाचा धक्कादायक खुलासा
बिहारमध्ये सलग दोनवेळा सत्तेवर राहिलेल्या नितीश कुमार यांचंही नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील आहे. पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची सुरुवातीपासूनच चर्चा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वेक्षणातही त्यांच्या नावावर बहुतांश लोकांनी सहमती दर्शवली आहे. राहुल गांधींशिवाय नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तगडं आव्हान असल्याचं 14 टक्के लोकांचं मत आहे.
दिल्लीची सत्ता सलग दोनदा जिंकल्यानंतर आम आदमी पक्षानं पंजाबमध्येही दणदणीत विजय मिळवला. गुजरातमध्ये पहिल्यांदाच 'आप' निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि तिथेही काही जागा जिंकल्यानंतर पक्षाचा उत्साह वाढला.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आता आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांचंही नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील झालं आहे. सर्वेक्षणातही त्यांची चांगली आकडेवारी समोर आली आहे. 14 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत अरविंद केजरीवाल पीएम मोदींसमोर पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतात.
पश्चिम बंगालच्या सलग तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आणि प्रबळ नेत्या ममता बॅनर्जी या विरोधकांचाही एक तगडा चेहरा असून त्यांचं नावही पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहे. अलीकडेच त्यांच्या पक्षातील एका खासदाराने उघडपणे त्यांचे नाव घेतले होते.
दरम्यान, एबीपी सी-व्होटर सर्वेक्षणात मात्र ममता बॅनर्जींच्या नावावर फारसे लोक सहमत नाहीत. ममता बॅनर्जी या पीएम मोदींसमोर प्रबळ उमेदवार असल्याचं केवळ 10 टक्के लोक मानतात.
याशिवाय सी-व्होटरनं जून महिन्यात एबीपी न्यूजसाठीही असंच सर्वेक्षण केलं होतं. त्यानंतर पंतप्रधानपदासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबतही जनतेला प्रश्न विचारण्यात आला होता.
उत्तर प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता खूप जास्त आहे. सर्वेक्षणात 8 टक्के लोकांनी त्यांना पंतप्रधानपदासाठी पहिली पसंती असल्याचं सांगितलं आहे.