Karnataka Swearing-In-Ceremony: नाश्त्याला इडली-डोसा, एकाच टेबलवर डीके अन् सिद्धरमैया; खर्गेंनी असा सोडवला मुख्यमंत्रीपदाचा पेच
आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार यांची भेट पार पडली. पक्षाचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर तिनही नेत्यांचे फोटो शेअर करत लिहिलंय की, विजेती टीम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App13 मे रोजी कर्नाटकच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. भाजपचा दारुण पराभव करत काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवली. तेव्हापासूनच कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण? हा प्रश्च चर्चेत होता. त्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन नाराजीनाट्यही रंगलं. पण अखेर आज हा पेच सुटला आहे. हा पेच सोडवण्यात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी भूमिका निभावली.
आणखी एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार रणदीप सुरजेवाला यांच्यासोबत नाश्ता करताना दिसतायत.
काँग्रेस हायकमांडला मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी तब्बल चार दिवस लागले. यादरम्यान अनेक बैठका झाल्या. या छायाचित्रात सिद्धरमय्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत बसलेले दिसत आहेत.
सिद्धरमय्या यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत डीके शिवकुमार हे सिद्धरमय्या यांना टक्कर देत होते. कर्नाटकातील विजयानंतर शिवकुमार यांनी दिल्लीत राहुल गांधी यांचीही भेट घेतली.
त्याचवेळी सिद्धरमय्या यांच्या नावाला मुख्यमंत्रिपद मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
सिद्धरमय्या यांच्या समर्थकांनी फटाके फोडून, नाचत आणि गाणं गात आनंद साजरा केला.