Parineeti Chopra Raghav Chadha: परिणीती-राघवच्या साखरपुड्याची पहिली झलक समोर! पाहा फोटो...
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा साखरपुडा आज पार पडला. नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर रंगलेल्या अनेक चर्चांनंतर अखेर आज या जोडप्याने फोटो शेअर करत अधिकृतरित्या आपल्या साखरपुड्याची माहिती दिली आहे.
परिणीती आणि राघव यांच्या शाही साखरपुड्याची थीम हटके होती.त्या दोघांनी पेस्टल रंगाचे आकर्षक कपडे घातले होते. दोघेही या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत.
परिणीती आणि राघव यांनी मॅचिंग आऊटफिट परिधान केले आहेत. राघव यांचा आऊटफिट फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाइन केला आहे. तर परिणीतीचा आऊटफिट बॉलिवूडचे लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला आहे. दोघांनी साखरपुड्याचं खास रोमँटिक फोटोशुट केलं आहे.
परिणीती आणि राघवने आपल्या चाहत्यांना आणि मीडियाला त्यांच्या साखरपुड्याची बातमी दिली आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना आजवर अनेकदा स्पॉट करण्यात आलं आहे.
अनेक दिवसांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक दिवस एकमेकांना डेटिंग केल्यानंतर अखेर आज त्यांनी साखरपुडा केला आहे. परिणीती-राघवसाठी आजचा दिवस खूप खास आहे.
बॉलिवूडचा लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा देखील परिणीती आणि राघवच्या साखरपुड्याला उपस्थित होते. बॉलिवूडचे लोकप्रिय सिने-दिग्दर्शक करण जौहरदेखील या साखरपुड्याला हजेर होते.
अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळींच्या उपस्थितीत परिणीती-राघव यांचा साखरपुडा पार पडला. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक सिने-कलाकार आणि नेते या दोघांच्या साखरपुड्याला उपस्थित होते.