Chandrayaan 3 Celebration : लहरा दो... चांद्रयान-3 च्या यशाचा देशभरात जल्लोष, देशवासियांचा उत्साह शिगेला
देशभर सर्वत्र इस्रो आणि भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक आणि जल्लोष साजरा केला जात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळयानाच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगच्या ऐतिहासिक कामगिरीचा जल्लोष करण्यासाठी आयोजित केलेल्या गुरु नानक खालसा महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान इस्रोच्या चांद्रयान-3 चे मॉडेल प्रदर्शित करण्यात आलं. (फोटो : पीटीआय/शशांक परेड)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाटणा : पाटणा महिला आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी चंद्राच्या पृष्ठभागावर इस्रोच्या चांद्रयान-3 चे यशस्वी सॉफ्ट लँडिंगचा जल्लोष साजरा केला. (फोटो : पीटीआय)
भोपाळमध्ये सेवा संकल्प युवा संघटनेच्या सदस्यांनी चांद्रयान-3 चं यशाचा जल्लोष साजरा केला. (फोटो : पीटीआय)
नागपुरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी इस्रो आणि चांद्रयान-3 च्या यशाचा आनंद साजरा केला. (फोटो : पीटीआय)
कराडमधील जनकल्याण शाळेच्या विद्यार्थ्यांनी खास प्रतिकात्मक मानवी साखळी तयार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. (फोटो : पीटीआय)
जम्मूमध्येही चांद्रयान-3 ची यशस्वी सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर गुरुवारी विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला. (फोटो : पीटीआय)
चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर अमृतसरमध्ये इस्रोचं अभिनंदन करणारा पतंग तयार केला आहे. (फोटो : पीटीआय)
चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचल्याचा जल्लोष जोधपूरमध्येही साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थी इस्रोचे अभिनंदन करण्यासाठी फॉर्मेशनमध्ये बसले होते. (फोटो : पीटीआय)
पाटणा महिला आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी चंद्राच्या पृष्ठभागावर इस्रोच्या चांद्रयान-3 चे यशस्वी सॉफ्ट लँडिंगचा जल्लोष साजरा केला. (फोटो : पीटीआय)
मुंबईत गुरुवारी 2023 रोजी चांद्रयान-3 चं यश साजरं करण्यासाठी रझा अकादमीचे कार्यकर्त्यांनी मिठाईचं वाटप केलं. (फोटो : पीटीआय/कुणाल पाटील)