Karnataka : कर्नाटकात राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 52 फूट उंचीच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
कर्नाटकात लवकरच विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप, काँग्रेस पक्ष वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून जनतेसमोर जात आहेत.
रविवारी राजहंसगड किल्ल्यावर 52 फूट उंचीच्या भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.
हा कार्यक्रम बेळगावच्या ग्रामीण काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आयोजित केला होता.
विशेष म्हणजे त्या अगोदर दोन दिवस कर्नाटक शासनातर्फे पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.
एकाच पुतळ्याचे दोन वेळा मोठ्या प्रमाणात अनावरण होण्याची ही पहिलीच घटना आहे.
पंचधातूची भव्य दिव्य मूर्ती किल्ल्यावर उभारण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज, आमदार सतेज पाटील,लातूर ग्रामीण आमदार धीरज देशमुख यांना निमंत्रित करण्यात आले होते.
सायंकाळी लेसर शो, क्रॅकर शो असा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पुतळा अनावरण कार्यक्रम थाटात साजरा झाला