Holi 2023 : होळीपूर्वी बरसाना-जयपूर शहर जल्लोषात तल्लीन; लाठमार-रासलीला रंगोत्सव उत्सवात साजरा, पाहा फोटो
होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. देशभरात होळीचा सण अगदी उत्साहा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर होळीला सुरुवातही झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहोळीचा उत्साह बाजारपेठेतही दिसून येतोय. ठिकठिकाणी विविध रंग, पिचकाऱ्यांनी बाजारपेठा अगदी खुलून गेल्या आहेत.
भारतातील सर्वात प्रसिद्ध होळी म्हणजे बरसानाची लाठमार होळी. या ठिकाणची होळी देशभर प्रसिद्ध आहे. येथे होळी खेळताना महिला पुरुषांना काठीने मारतात.
मथुरेजवळील बरसाना नावाच्या गावात लाठमार होळी खेळण्याची अनोखी परंपरा आहे.
मथुरेजवळील नांदगाव येथे रंगांच्या उत्सवाचा एक भाग म्हणून नंद भवन मंदिरात महिलांचा होळी खेळताना आनंद पाहायला मिळतोय.
जयपूर देखील होळी साजरी करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. होळीमध्ये येथे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
या कार्यक्रमात गाण्याचे प्रदर्शन, राजस्थानी लोकनृत्य, रासलीला असे अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात.
एकूणच देशभरात होळीच्या उत्सवाला अगदी जोरदार सुरुवात झाली आहे.